जय देव जय देव श्रीशाशिनाथा l
आरती ओंवाळू पदिं ठेवुनि माथा ll धृ.ll
उदयीं तुझ्या हृदयीं शीतळता उपजे l
हेलावुनि क्षीराब्धी आनंदे गर्जे l
विकसित कुमुदिनी देखुनि मनही बहु रंजे l
चकोर नृत्य करिती अदभुत सुख माजे ll जय.ll 1 ll
विशेष महिमा तुझा न कळे कोणासी l
त्रिभुवनिं द्वादशीराशी व्यापुनि राहसी l
नवही ग्रहांमध्यें उत्तम आहेसी l
तुझे बळ वांछीती सकळहि कार्यासी ll जय.ll 2 ll
शंकरगणनाथादिक भूषण मिरवीती l
भाळी मौळी तुजला संतोषे धरिती l
संकटनामचतुर्थीस रूपजन जे करिती l
संतत्ती संपत्ति अंती भवसागर तरती llजय.ll 3 ll
केवळ अमृतरूप अनुपम्य वळ्सी l
स्थावर जंगम यांचें जीवन आहेसी l
प्रकाश अवलोकितां मन हे उल्हासी l
प्रसन्न होउनि आतां लावी निजकांसी ll जय.ll 4 ll
सिंधूतनया बिंदू इंदू श्रीयेचा l
सुकर्तिदायक नायक उड्डगण यांचा l
कुरंगवाहन चंद्र अनुचित हे वाचा l
गोसावीसुत विनवी वर दे मज साचा ll जय.ll 5 ll